पतित पावन संघटनेच्यावतीने आंदोलन

0

पुणे । सतत वाढणार्‍या पेट्रोलच्या भाववाढीविरोधात पतित पावन संघटनेच्या वतीने सर परशुराम महाविद्यालय चौकात निर्दशने करण्यात आली. ‘कच्चा तेलाचे भाव तळाला, पण पेट्रोलचे भाव गगनाला’ अशा घोषणा देऊन वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजा पाटील, पुणे शहर अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, श्रीकांत शिळीमकर, स्वप्निल नाईक, संतोष शेंडगे, आनंद वाघमारे, महेश पाटोळे, शेखर चिकणे, राजू मोहोळ, ओंकार महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या 72 दिवसांमध्ये 16 रुपयांनी पेट्रोल मध्ये वाढ करण्यात आली आहे, आणि रोजच्या रोज इंधनाच्या किंमतीत वाढ करण्याचे धोरण सरकारने रद्द करावेत अशी मागणी घोषणांद्वारे कारण्यात आली.