पतीचा जुळाभाऊ असल्याचा फायदा घेत वहिनीवर दिराचा अत्याचार

लातूर : पतीचा जुळाभाऊ असलयाचा फायदा घेत नराधम दिराने वहिनीवरच अत्याचार केल्याची संतापजनक घटना लातुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी लातूरमधील शिवाजी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री झोपल्यावर पती लघुशंकेचे निमित्त करुन निघून जायचा आणि त्याच्या जागी दीर येऊन तिच्यावर अत्याचार करायचा, अशी तक्रार विवाहितेने नोंदवली आहे. नवरा आणि तिचा दीर यांच्यामध्ये कमालीचे साम्य असल्याचेही या घटनेतून दिसून आले आहे.

पीडीतेने नोंदवली तक्रार
हा प्रकार साधारणतः एक वर्षापूर्वीचा आहे. ही महिला आता माहेरीच राहात असून नवर्‍यासोबत नांदण्यास येण्यास तिने नकार दिला आहे. त्या नंतर तिने ही तक्रार दाखल केली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक, अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

राज्यात उडाली खळबळ
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेने कुटूंबाच्या व्याख्येला काळिमा फासली आहे अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. याचबरोबर नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.