बोदवड : पतीच्या त्रासाला कंटाळून 34 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. बोदवड शहरात बुधवार, 13 रोजी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला मयत विवाहितेच्या पती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कविता विनोद भिसे (34, रा.बळीराजा मंगल कार्यालयाच्या मागे, बोदवड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पतीच्या त्रास असह्य झाल्याने कविता भिसे या विवाहितेने बुधवार, 13 रोजी राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी चावदस गणपत पठारे यांच्या फिर्यादीवरुन मयताचा पती विनोद विश्वनाथ भिसे याच्याविरुद्ध बोदवड पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.माळी करीत आहे.