पतीच्या जाचाला कंटाळून गरोदर महिलेची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड : पतीच्या जाचाला कंटाळून दोन महिन्याच्या गरोदर महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक प्रकार 29 जानेवारी रोजी सकाळी घडला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले आहे. मनीषा राजेंद्र प्रजापती (वय 25, रा. विशालनगर पिंपळे निलख, मूळ गाव उत्तरप्रदेश) असे महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ मनोज कुमार प्रजापती यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून तर पती राजेंद्र प्रजापती (वय 29) याला अटक केली आहे.

चार वर्षांपूर्वी विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिषा व राजेंद्र यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षाचा मुलगा आहे. ते मुळचे उत्तरप्रदेशचे होते. राजेंद्र हा त्याचा भाऊ व भावजयी सोबत रहात होता. दरम्यानच्या काळात दोन महिन्यांची गरोदर राहिली होती. यावेळी मनिषाला बाळ नको होते तर राजेंद्रला बाळ हवे होते. त्यात राजेंद्र तिच्या दिसणावरुन व कमी मिळालेल्या हुंड्यावरुन सतत टोचून बोलत असे. त्यामुळे सोमवारी राजेंद्र हा आंघोळ करत असताना स्वतःसला जाळून घेतले. यामध्ये ती गंभीररीत्या भाजली गेली होती. तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सांगवी पोलीस ठाण्यात राजेंद्र विरोधात गुन्हा दाखल झाला असून सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.