तळेगाव । जेवण बनविले नाही म्हणून रागावलेल्या पतीने दारुच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे बुधवार रात्री 10.30 च्या सुमारास घडली. शारदा अशोक चौरे (वय 34) मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अशोक विठ्ठल चौरे (वय 40) याला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अशोक व शारदा चौरे हे भगवान संतू दरेकर यांच्या वीटभट्टीवर काम करीत होते. बुधवारी रात्री शारदाने जेवण बनविले नाही. या कारणावरून अशोकने तिला दांडक्याने मारहाण केली. तसेच तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहेत.