पतीने केला 40 हजारासाठी पत्नीचा खून

0

जामनेर । येथील एका खाजगी दवाखान्यात काम करणार्‍या महिलेचा पती सोबत झालेल्या पैशाच्या वादातून काल 3 तारखेला पतीकडून केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात डोक्यात मार लागून गंभीर जखमी झालेल्या. महिलेचा जळगाव येथे उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला आहे. यामुळे पोलिस ठाण्यात या घटनेेेबाबत मयत महिलेचा पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी पती फरार आहे.

मनिषा अनिल सपकाळ (वय-26) हि विवाहित महिला सुविधा हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर काम करत होती.तर आरोपी अनिल सपकाळ हा हॉटेलवर काम करतो.प्राथमिक माहिती नुसार त्याने मालकाकडून काही रक्कम अँडव्हान्स घेतली होती.दरम्यान मयत मनिषा सपकाळ यांचे घरकुल मंजूर होवून त्याचा पहिला हप्ता म्हणून रुपये चाळीस हजाराचा चेक नुकताच शुक्रवारी जलसंपदा मंत्री यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.त्यात मनिषा सपकाळ या महिलेलाही याचा लाभ मिळाला होता. मात्र पती अनिल याने मालकाकडून घेतलेली अँडव्हान्स परत करण्यासाठी चेक मधील रकमेसाठी तगादा लावला मात्र त्याच्या म्हणण्याला पत्नी मनीषा जुमानत नसल्यानेच त्याने हे कृत्य केले असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. त्याने पत्नी मनिषाला दवाखान्यातील चालू कामावरून बळजबरी बाहेर बोलावून आणत. घराजवळच्या गल्लीत कुठल्या लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले.त्यावेळी आरडा ओरड झाल्याने अनिल तेथून लगेचच पळून फरार.नंतर मनिषाला दवाखाना बाजुलाच असल्याने काहीनीं तेथे नेले. प्रथमोपचार करून डॉ.विनय सोनवणे यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या मनिषाला तात्काळ जळगाव येथे रवाना केले.मेंदूला जबर मार लागल्याने अतिदक्षता विभागात उपचारा दरम्यान मनिषा सपकाळ यांचा मृत्यू झाला. याबाबत आता महिलेचा पती अनिल सपकाळ विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात खुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अनिल सपकाळ फरार झाला.