पतीवर रॉकेल टाकुन पेटवणार्‍या पत्नीसह चौघांवर गुन्हा

0

चाळीसगाव । पत्नीला पैसे दिले नाही म्हणुन पत्नीने आई भाऊ सह चौघांच्या मदतीने पतीच्या अंगावर टाकुन पेटवुन दिल्याची घटना 11 रोजी घडली होती जखमी पतीने धुळे येथे उपचार सुरु असतांना दिलेल्या जवाबावरुन पत्नीसह इतर चौघांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, उमेश रतन चौधरी (वय-30) रा.गजानन वाडी मारोती मंदीराजवळ चाळीसगाव हे वाहनचालक असून 11 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी निता उमेश चौधरी यांनी त्यांच्याकडे पैसे मागीतले ते दिले नाही याचा राग येवुन त्यांची सासु आरोपी कमल दगडु चौधरी, शालक गणेश दगडु चौधरी, शालकाची पत्नी उषा गणेश चौधरी व त्यांचा मुलगा भूषण गणेश चौधरी सर्व रा. चाळीसगाव यांनी त्यांना पकडुन ठेवले व त्यांच्या पत्नी निता चौधरी यांनी राॅकेलने भरलेली बाटली अंगावर टाकुन पेटवुन दिले होते. त्यात उमेश चौधरी 45 टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धुळे पोलीसांनी त्यांचा रुग्णालयात जवाब घेतल्यानंतर ते कागदपत्र चाळीसगाव पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावरुन आरोपी निता उमेश चौधरी, कमल दगडु चौधरी, गणेश दगडु चौधरी, उषा गणेश चौधरी व भूषण गणेश चौधरी यांच्या विरोधात गुरनं 30/2018 भादवि कलम 307, 323, 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि युवराज रबडे करीत आहेत.