पिंपरी-चिंचवड : नवीन फ्लॅट घेण्यासाठी व गावी घरबांधण्यासाठी सासरच्या मंडळींनी 28 वर्षीय विवाहीत महिलेचा शारीरिक छळ केला. अश्विनी विश्वास राऊत (वय 28 रा. आधार हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पती विश्वास (वय 31), दीर विनय उद्धव राऊत (वय 27), सासू सुषमा उद्धव राऊत (वय 60) सासरे उद्धव हरी राऊत (वय 61) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे नवीन फ्लॅट घेण्यासाठी तसेच नागपूरला घर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून 10 लाख रुपये आण व तू करत असलेल्या नोकरीचा सारा पगारही आम्हाला दे असे म्हणत सासरच्या मंडळीने 22 जुलै 2016 ते 7 सप्टेंबर 2017 या कालावधीत माझा शारीरिक व मानसिक छळ करत आहे, अशी तक्रार अश्विनी यांनी दिली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सासरच्या चारही जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.