पती-पत्नीच्या वादात ‘कोमल’चा करूण अंत

0

मुलीची हत्या करुन पसार पित्याला पारोळ्यातून अटक ः पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून घटनेची शक्यता

जळगाव– आपल्या सात वर्षीय चिमुकलीला खाजगी शिकवणीमधून परस्पर सोबत घेवून दुसर्‍या दिवशी सकाळी तिला जन्मदात्या पित्याने बांभोरी उड्डाणपूलावरुन फे कून तिची हत्या केल्याची धक्कादायक व हृदय पिळवून टाकणारी घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास समोर आली. कोमल संदीप चौधरी वय 7 वर्ष, असे चिमुकलीचे नाव आहे. बांभोरी फुलावरुन मुलीला फेकून दिल्यानंतर फरार झालेल्या संशयित संदीप यादव चौधरी वय 32 रा. हिरागौरी पार्क, खोटेनगर या पित्याला पारोळा येथून पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातूनची ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिकवणीमधून परस्पर मुलीला नेले सोबत

चिमुकली कोमल हिची आई नयना हिने दिलेल्या माहितीनुसार कोमल बुधवारी नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली होती. सायंकाळी 4 वाजता संदीप हा कामावरुन आला. बैठकीला जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. यानंतर त्याने शिक वणीमधून कोमल हिला परस्पर सोबत घेतले. कोमलची बॅग शिकिवणीमध्ये राहू दिली. रात्री 10 वाजेपर्यंत कोमल व पती संदीप घरी न आल्याने नयना हिने नातेवाईकांना माहिती शिकवणीच्या ठिकाणी चौकशी केली असता, असता वडील संदीप तिला घेवून गेल्याची माहिती मिळाली.

वेल्डींग मालकाला केला, मुलीला फेकल्याचा मेसेज

गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास संदीपने तो काम करत असलेल्या वेल्डींग दुकानाचा मालक यास मोबाईलवरुन मेजेस टाकला. यात मी माझ्या मुलीला बांभोरी पुलावरुन खाली फेकले असून मी आत्महत्या करण्यात जात असल्याचे नमूद होते. मेसेज वाचताच दुकान मालक थेट तालुका पोलीस ठाण्यात पोहचला. याठिकाणी कोमल तसेच वडील बेपत्ता असल्याबाबतची तक्रार देण्यासाठी आधीच कुटुंबिय तसेच नातेवाईक आलेले होते. तालुका पोलीस ठाण्यात कोमल बेपत्ता असल्याची नोंद दाखल करण्यात आली होती.

50 ते 60 फुट उंचीच्या पूलावरुन मुलीला खाली फेकले

संदीपच्या मालकाला मोबाईलमध्ये मिळालेल्या मेसेजनुसार कुटुंबियांनी तसेच पो लिसांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी नातेवाईक मामाने ओळखी पटविली. मा हिती मिळालीनुसार अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी, कर्मचारी वासुदेव मराठे, प्रितम पाटील, साहेबराव पाटील यांच्यासह स्था निक गुन्हे शाखेचे शरद भालेराव, उमेश गोसावी यांनी घटनास्थळ गाठले. फा ॅरेन्सिक पथकाला याठिकाणी पाचारण करण्यात आले. पंचनामा करण्यात येवून दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. नावाप्रमाणेच दिसायला सुंदर व ’कोमल’ असलेल्या चिमुकलीला 50 ते 60 उंचीच्या बांभोरी फुलावरुन मुलीला फेकून दिल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. याठिकाणी पूलावरुन ये-जा करणार्‍या वाहनधारकांसह, तसेच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

पती माझ्यासाठी मेला, त्याने नाव लावायचे नाही…

बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे क ळाल्यावर आई नयना यांना रहावले नाही. तिला पाहण्यासाठी त्यांना नातेवाईक ांसोबत घटनास्थळ गाठले. याठिकाणी मुलीचा मृतदेह पाहताच कोमल, माझ्या क ोमलला मेल्याने मारुन टाकले असा संताप व्यक्त करत नयना हिने आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयातही तिचा आक्रोश सुरु होताच. याठिकाणी नयना यांचेकडून पो लिसांनी शवविच्छेदनाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती घेतली असता, पती माझ्यासाठी मेला, मुलीच्या समोरही तिच्या बापाचेही नाव लावू नक ा, बाप आपल्या मुलीला असे मारु शकत नाही असा संताप केला. पोलिसांची समजूत घातली. यानंतर नयना यांनी कागदपत्रावर स्वाक्षरी केली.

संशयित पित्याला पारोळा येथून घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप याने कोमल हिला पूलावरुन फेेकल्यानंतर तो पारोळ्याकडे पसार झाला. याठिकाणी मद्यप्राशन केले. दारुच्या नशेत पारोळा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या मागे तो पडलेला होता. यापूर्वी त्याने काही नातेवाईकांना पारोळा येथे असल्याचे कळविले होते. नातेवाईकांनी याबाबत पो लिसांना माहिती दिली. पारोळा पोलिसांनी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास पारोळ येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या मागून दारुच्या नशेत ताब्यात घेतले.

दीड वर्षापूर्वीच जळगावात झाला स्थायिक

संदीप यादव चौधरी हा मूळचा अमळनेर तालुक्यातील करनखेडा येथील रहिवासी आहे. नोकरीनिमित्ताने तो पुण्याला वास्तव्यास होता. याठिकाणी कंपनीमध्ये काम करुन तो उदरनिर्वाह भागवित होता. मात्र मिळणारे वेतन व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने तो दीड वर्षापूर्वी शहरातील खोटेगनर परिसरातील हिरा गौरीपार्क प रिसरात पत्नी नयना व मुलगी कोमल या कुटुंबासोबत भाड्याने वास्तव्यास होता. व याच परिसरातील शरद ऑटो या वेल्डींगच्या दुकानावर काम करुन तो उदर निर्वाह भागवित होता. कोमल ही वर्ल्ड इंग्लिश मीडीयममध्ये सिनिअरमध्ये शिक्षण घेत होती.

मुलीला कशासाठी मारले, कारण गुलदस्त्यातच

घटनास्थळी दोन पाण्याच्या बाटल्या, एक स्टिलची ताटली, त्यात कांदा, चप्पल, कापडी पिशवीअसे मिळून आले. त्यामुळे संदीपने कोमलला पूलावरुन फेकले क ी, पूलाखाली नेवू काही तरी खावू घालून तिला मारले. नेमके कोणत्या क ारणावरुन संदीप एवढा निर्दयी झाला व त्याने आपल्या पोटच्या गोळ्याला एवढ्या मोठ्या उंचीवरुन फेकले, हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. संदीपचे पत्नी नयना हिच्या सोबत दहा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. मात्र ते कशावरुन झाले हे कळालेले नाही. नयना हिच्या तोंडून भावनेच्या भरात भांडण झाले होते, मात्र त्यावेळी मारले नाही, व आता कुठलेही भांडण नसतांना मारले असे समोर आले. त्यामुळे नेमके भांडण काय? दहा दिवसांपूर्वी झालेले हेच भांडण तर चिमुकली क ोमलच्या मृत्यूस कारणीभूत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या चौक शीत समोर येणार आहेत.