पती सापडला प्रेयसीसोबत : पत्नीने दोघांना धुतले

Walked with girlfriend in the name of getting a job in college : Jalgaon wife washes both of them on sight
जळगाव :
 विवाह झाल्यानंतर प्रेमप्रकरण स्वस्थ बसू देत नसल्याने रविवारी सुटी असताना महाविद्यालयात जाण्याची थाप पतीच्या चांगलीच अंगलट आली आहे. पतीसोबत असलेल्या कथित प्रेयसीला रेस्टारंटमध्ये पाहताच संतप्त झालेल्या पत्नीने रणरागिणीचचा अवतार धारण करीत पतीसह प्रेयसीची चांगलीच धुलाई केली. जळगावातील घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दोघांच्या कानशीलात लगावली
पती हा शिरसोली रस्त्यावरील एका महाविद्यालयात नोकरीला आहे. रविवारी सुट्टी असतानाही तो महाविद्यालयात जायचे असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर पती महाविद्यालय परिसरात रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नीने तिच्या भावाला सोबत घेत रेस्टॉरंट गाठले. तेथे तो प्रेयसीसोबत नाश्ता करत होता. हे पाहून पत्नीने दोघांच्या कानशिलात लगावली.

निर्भया पथकाची वेळीच धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तिथे गेल्यावर पतीच्या प्रेम प्रकरणाचा भांडाफोड झाला. ठाणे अंमलदार रामकृष्ण पाटील यांनी पती- पत्नी आणि ती असे तिघांचे म्हणणे ऐकून घेत प्रेयसीच्या आई- वडिलांनाही पोलीस ठाण्यात प्राचारण केले. प्रेयसीला तिच्या आई- वडिलांच्या तर प्रियकराला मेहुण्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेच्या संदर्भात पत्नीने पती व प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आहे. तू माझ्यावर संशय घेऊ नको, नाही तर मी माझ्या हाताच्या नसा कापून घेईल किंवा रस्त्यावर वाहनांच्या समोर उभा राहून जीव देईन, अशी धमकीही पतीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास समाधान टहाकळे करीत आहेत.