पत्नीचा छळ करणार्‍या जलसेवक पतीची केली धुलाई

0

धुळे । पुनर्विवाह झालेल्या पत्नीची मालमत्ता हडप करुन तिचा शारीरीक व मानसिक छळ करणार्या पाणी पुरवठा विभागातील जलसेवक पतीला पोलीस ठाण्यात बोलवून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी सिनेस्टाईल चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.धुळे येथील पाणी पुरवठा विभागात जलसेवक म्हणून कार्यरत असलेला मुरलीधर रंगराव मिस्तरी यांचा मिनाक्षी सोबत 2000 साली पुनर्विवाह झाला. विवाहानंतर मिनाक्षीची मालमत्ता मुरलीधरने स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यानंतर या दोघात वाद होऊ लागले. मिस्तरी हे मिनाक्षीला सतत मारहाण करुन तिचा छळ करु लागले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. मिस्तरी हा न्यायालयात कामकाजासाठी हजर राहत नसल्याची तक्रार मिनाक्षीची होती.

पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांची गर्दी
दरम्यान, मिनाक्षी मिस्तरी यांनी शिवसेनेच्या महानगर महिला आघाडी संघटिका हेमा हेमाडे यांच्याशी संपर्क साधला. आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार हेमा हेमाडे यांनी मुरलीधर मिस्तरी यांना फोन केले. सुरवातीला त्यांचे फोनच न घेणार्या मिस्तरी यांनी अखेरीस त्यांच्याशी फोनवर बोलणे रकेले. यावेळी दोघांत वाद झाल्याने मिस्तरी यांनी हेमाडे यांनाही शिवीगाळ केल्याचे समजते. या प्रकरणी दी 11 रोजी मिनाक्षी यांच्यासह हेमा हेमाडे या शहर पोलीस ठाण्यात आल्यात. त्यानंतर मिस्तरींनाही तेथे बोलविण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातच मिस्तरी व हेमाडे यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने हेमा हेमाडे यांनी थेट मिस्तरी यांची धुलाई करीतच निरीक्षकांच्या दालनात मिस्तरी यांना नेले. यावेळी मिस्तरीची पत्नी मिनाक्षी हिनेही मिस्तरीला शिवीगाळ करीत संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अखेरीस या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीनुसार मुरलीधर मिस्तरी आणि हेमा हेमाडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.