पत्नीचा विष प्राशनामुळे मृत्यू ; पतीनेही फेसबुक लाईव्ह करत रेल्वेखाली केली आत्महत्या

0

जळगाव – शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणाऱ्या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन प्रमोद शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने फेसबुक लाइव्ह करत मंगळवारी सकाळी रेल्वे खाली
आत्महत्या केली. पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे

कांचनगरातील प्रमोद शेटे यांची पत्नी कांचन हिचा मंगळवारी सकाळी विष प्राशनामुळे मृत्यू झाला. यानंतर पती प्रमोद शेटके याने ही परिसरातील रेल्वे लाईनवर रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाइव्ह सुद्धा केली .यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले आहे.