पत्नीची कुर्‍हाडीने हत्या करणार्‍या पतीस जन्मठेप

0

शहादा । पत्नी आवडत नाही म्हणून तिच्यावर कुर्‍हाडीने वारकरून ठार मारल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तालुक्यातील नवी हिअणी येथील अशोक सुकाम दाभाडे याने पत्नी आवडत नाही म्हणून तिचा 12 जुलै 2015 रोजी राहत्याघरी पत्नी हिरकनबाई अशोक दाभाडे (वय 35) हिच्यावर कुर्‍हाडीने वारकरून जिवे ठार मारले होते. याबाबत हिंणगी येथील माजी पोलीस पाटील जीवन पाटील याने सारंगखेडा पालीसात माहिती दिली होती. आरोपी विरूद्ध शहादा न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायाधिशांनी जन्मठेपीची शिक्षा व दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाएची शिक्षा सुनावली यावेळी सरकारपक्षातर्फे सुवर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले.