पत्नीची लाखात विक्री, आरोपी पोलीस कोठडीत

0

भुसावळ । गुजरात राज्यात पत्नीची एक लाखात विक्री केल्याप्रकरणी आरोपी मोहन भागवत सोनवणे (32, रा. वरणगाव) यास मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास मंगळवार, 15 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील दलालासह विवाहितेची खरेदी करणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. खान्देशासह मराठवाड्यातील मुलींची थेट विक्रीच होत असल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. नारंगभाई मेर (31, रा. कनकोट) व दलाल रसुलभाई दाऊदभाई जोगी (65, नाना असराना) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीत आरोपी रसुलभाईने भावनगर जिल्ह्यातील दोन समाजात खान्देशातील मुलींची विक्री झाल्याची कबुली दिल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते.