शिरपूर। शिरपूर शहरातील गणेश कॉलनीत प्लॉट नं.1 मध्ये राहणार्या नफीसा बी दिदार खाटीक यांचा 16 मे रोजी भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला होता. अगदी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहत असलेल्या या महिलेचा मारेकर्यांनी खून केला होता. मारेकर्यांनी खून केल्यानंतर घरातील सी.सी.टी. व्ही. कॅमेर्यांचे सर्कीटच नेल्यामुळे तब्बल तीन महिने उलटल्यानंतर मयताच्या संशयित पती दीदार उर्फ राजू अंडेवाले यास धुळे एलसीबीच्या पथकास अटक करण्यात आले आहे. दरम्यान शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेशसिह परदेशी, संदीप थोरात,जितेंद्र आखाडे,दिलीप माळी यांच्या पथकाने केली.
खूनाच्या तीन महिन्यानंतर पतीवर संशय
शहरातील गणेश कॉलनीतील प्लॉट नं.1 मध्ये दिदार उर्फ राजू खाटीक हे कुटूंबासमवेत राहत होता. त्याचा अंडे व बोंबिल विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे तो 16 मे रोजी ग्रामीण भागात गेला होता. तर त्याचा मुलगा अतिफ हा घटनेच्या दिवशी हा गावात विवाह सोहळ्यास गेला होता. अतिफ गावातील कुरेशी मोहल्यात डॉ.कुरेशी यांच्याकडे विवाह सोहळा असल्याने आई नफीसा बी खाटीक यांना विवाहसोहळ्याच्या ठिकाणी सोडून गावातील दुकानावर निघून गेला. किचन व बेडरूममध्ये जावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. तर आईचा फोन हा किचन ओट्यावर पडला होता. त्याने ही बाब मोठा भाऊ अरबाज व काकू सायराबी यांना सांगितली. ते आल्यानंतर त्यांनी घरात पाहिले असता नफीसा बी खाटीक यांचा मृतदेह घरातील शौचालयात हातपाय बांधून पडलेला आढळला. यातील नेकलेस हा मारेकर्यांनी नेला असावा असा संशय व्यक्त होत आहे. मात्र मारेकर्यांनी खाटीक यांच्या अंगावरील एकही दागिना काढला नसल्यामुळे नेमका त्यांचा उद्देश हा चोरी नसून खूनच असावा असा संशय देखील व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान तब्बल तीन महिन्यांनंतर धुळे एलसीबीने खुनाचा छडा लावत संशयित आरोपी राजू अंडेवाला यास जेरबंद केले आहे.