नवी मुंबई : पत्नीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून तुर्भे येथे राहणार्या एकाने सानपाडा रेल्वे स्थानक रेल्वे रुळालगत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणाची नोंद सानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अंकुश लक्ष्मण काकडे (35) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ते तुर्भे एमआयडीसीमधील श्रमिक नगरमध्ये राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांनी सानपाडा एमजीएम रुग्णालयसमोर असलेल्या रेल्वे रूळालगत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिट्ठी लिहून ठेवल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या पत्नीचे तिसरे प्रेमप्रकरण असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद सानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.