पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही सोडले जग : एकाचवेळी निघाली अंत्ययात्रा

यावल : पत्नीच्या मृत्यूनंतरही पतीनेही जग सोडल्याची घटना तालुक्यातील चिंचोलीत 23 रोजी घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. गुरुवार, 24 रोजी दाम्पत्याची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.

पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू
चिंचोलीचे रहिवासी तथा यावल पंचायत समितीचे माजी सदस्य गणपती भाऊराव साठे यांच्या पत्नी कोकीळाताई गणपती साठे (70) यांचे बुधवार, 23 जून रोजी दुपारी दीड वाजता अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पती गणपती भाऊराव साठे (75) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांन जळगावच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र रात्री अकरा वाजता त्यांनीही जगाचा निरोप घेतला. पती-पत्नीचे एकाच दिवशी काही तासाच्या अंतरावर निधन झाल्याने चिंचोली व परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या दाम्पत्याच्या पश्‍चात प्रगतशील शेतकरी सुनील साठे तर मन्यारखेडा येथील ग्रामसेवक अनिल साठे ही दोन मुले तर दोन विवाहित मुली, सुना नातवंडे असा परीवार आहे.