पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पतीस सात वर्षाची शिक्षा

0

जळगाव :दारूसाठी पैसे दिले नाही या कारणावरून रागाच्या भरात दारूड्या पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यावर कुदळीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. उपचारार्थ घेवून जात असतांना त्या महिलेचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आज निकाल जाहिर करण्यात आला. यात न्या. एम.ए.लव्हेकर यांनी आरोपी पती अंकूश ज्ञानेश्‍वर सपकाळे यांनी सात वर्षाची सक्तमजुरी सुनावली. यातच तीन हजा रुपयांचा दंड देखील सुनावला आहे.

तालुक्यातील कठोरा येथील रहिवासी अंकूश ज्ञानेश्‍वर सपकाळे हा 7 एप्रिल रोजी रात्री दारूच्या नशेत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने पुन्हा दारू पिण्यासाठी पत्नी रत्नाबाई हिच्याकडे पैसे मागितले. रत्नाबाई यांनी पैसे नाहीत, कुठून आणू पैसे असे सांगितल्यानंतर अंकूश याने पत्नी रत्नाबाई यांच्याशी या कारणावरून भांडण केले. यानंतर दोघे विना जेवन करत झापले. 7 एप्रिलच्या मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास अंकूश याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही याचा राग मनात ठेवून घरातील लोखंडी कुदळीच्या लाकडी दांड्याने रत्नाबाई ह्या झोपेत असतांना तीच्या डोक्यावर तसेच नाका, कानावर वार वार करून मारले. यात रत्नाबाईंना गंभीर दुखापत झाली. त्या आरडा-ओरडा करीत असतांना शेजारीच झोपलेला मुलगा उमेश याला आई हि रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. त्याने तेथून पळ काढत गावातच राहणार्‍या आजोबांकडे जावून घटना सांगितली. यानंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 8 एप्रिलला सांयकाळी पोलीसांनी अंकूश सपकाळे याला अटक केली होती. त्यानंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

असे कलम, अशी शिक्षा…

या प्रकरणी न्यायाधीश एम.ए.लव्हेकर यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. यात सरकारपक्षातर्फे पोलीस पाटील, आरोपीचे वडील, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी आदी असे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले होते. या खटल्याचा शनिवारी निकाल जाहिर करण्यात आला. यात न्यायाधीश एम.ए.लव्हेकर यांनी मयत रत्नाबाई हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आरोपी पती अंकूश ज्ञानेश्‍वर सपकाळे याला शनिवारी शिक्षा सुनावली. त्यात कलम 304 (2) मध्ये 7 वर्ष शिक्षा, 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने कैद; कलम 504 अन्वये 1 महिने शिक्षा, 300 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवस साधी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अ‍ॅड. विजय दर्जी यांनी कामकाज पाहिले.