भिलवडी । धनगावचे माजी उपसरपंच संभाजी साळुंखे यांच्या पत्नी व साहित्यभूषण म. भा. भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सरिता साळुंखे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. केवळ दहा वर्षांचा संसार आणि पहिलीत शिकणारा मुलगा पदरी. सरिता यांच्या मृत्यूमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. रक्षांचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात न करता, दोन खड्ड्यात रक्षा ठेवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.कृष्णेच्या पात्रात रक्षाविसर्जन केले.