पत्नीच्या हत्येप्रकरणी पती अटकेत

0

उल्हासनगर : घरगुती कारणावरून पत्नीच्या डोक्यामध्ये ठोश्याबुक्कयाने व कोणत्यातरी बोथट साधनाने मारहाण करून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार शहरातील कॅम्प नं. ३ येथील सेंट्रल हॉस्पिटल एरीया परिसरातील नानक जिराचौक येथे राहणारी सौ.पिंकी सोनूसिंग लाबाना(२२) ही महिला राहत्या घरात पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मध्वर्ती रूग्णालयात नेण्यात आले होते. पण डॉक्टरांनी तिला मयत घोषीय केल्यावर याप्रकरणी प्रथम मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. सौ.पिंकी हिचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला आहे याची माहिती मिळण्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त केल्यावर त्यात पिंकी हीच्या डोक्यावर मारहाण केल्यामुळे व कोणत्यातरी बोथट साधनेने डोक्यावर प्रहार केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय पिंकी हीचा मोठा भाऊ बलवीरसिंग सरदार व नातेवाईक यांनी पिंकी हिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत तिचा पती सोनूसिंग लबाना(३०) याने तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

याप्रकरणी स.पो.नि.दादाभाऊ परते यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन सोनूसिंग लबाना याच्याविरूध्द मध्यतर्वी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हाजर केले असता १७ तारेखेपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी केलेल्या अधिक चौकशीत सौ.पिंकी हि गुजरात येथील राहणारी असून सन २०११ साली तिने तिच्या नात्यातील सोनूसिंग(३०) याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. सोनूसिंग याचे पहिले लग्न झाले असून त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला १ मुलगी आहे. सौ.पिंकी हिने सोनूसिंग याच्याशी लग्न केल्यावर ती कॅम्प नं. ३ येथील नानक जिराचौक याठिकाणी राहत होता. तिला सोनूसिंगपासून १ मुलगा असून सोनूसिंग याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो पिंकी हिला नेहमी मारहाण करीत असायचा. घटनेच्या ३ दिवसाआधी सोनूसिंग याने पिंकी हिला मारहाण केल्यामुळे तिने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात पती सोनूसिंग याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच गोष्टीचा राग धरून सोनूसिंग याने पिंकी हिला मारहाण करून तिची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हयाचा अधिक तपास स.पो.नि.दादाभाऊ परते व त्यांचे राईटर पो.कॉ.सुधेश घाग करीत आहेत.