यावल । तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अशोक मुरलीधर तायडे याने पत्नीवर अत्याचार करुन पत्नीच्या नावाचा दुसर्या बेकायदेशीर असलेल्या पत्नीसाठी शासकीय दप्तरी व दस्तऐवजावर वापर करुन फसवणूक करुन पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी खुर्द येथील 35 वर्षीय विवाहीतेने पोलीस ठाण्यात पती अशोक मुरलीधर तायडे याच्या विरुध्द फिर्याद दिली आहे.
पहिल्या पत्नीच्या कागदपत्रांचा वापर दुसरीसाठी
सन 2003 मध्ये लग्न झाले मात्र पतीच्या छळामुळे सन 2010 मध्ये विवाहीता अकोला यथे माहेरी गेली. तर पती पुणे येथे नोकरीस होता तेव्हा त्याने दुसर्या महीलेशी संबध प्रस्तापित केले व तीला सांगवी खुर्द येथे आणले पतीपासून मला तसेच दुसर्या पत्नीस प्रत्येकी दोन अपत्य आहेत. दोन्ही बाळंतपणात भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसर्या पत्नीचे नाव म्हणून पहिल्या पत्नीच्या नावाचा वापर केला तसेच गावात मतदान कार्ड काढण्यासाठी देखील नावाचा वापर केला.
अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून दोन्ही पत्नींनी सोडले घर
दरम्यानच्या काळात खोटे बोलून मला सांगवी येथे आणले आम्ही दोघीही एकत्र नांदत असतांना पतीने सतत अत्याचार तसेच अनैसर्गिक अत्याचार करीत होते. या त्रासाला कंटाळून आम्ही दोघी 6 जुलै रोजी माहेरी अकोला येथे निघुन गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात पतीविरूध्द 2004 मध्ये अकोला पोलीस ठाण्यात तर 2013 मध्ये यावल पोलीस ठाण्यात शारीरीक व मानसीक छळ करीत असल्याच्या फिर्यादि नोंदविली आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, कॉन्स्टेबल संजीव चौधरी, संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.