नातेवाईकांचा आरोप ; हरिविठ्ठल नगरातील प्रौढाचा संशयास्पद मृत्यू
जळगाव- शहरातील हरिविठ्ठल नगरातील सुरेश भास्कर नाडे (वय 43) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास घडली. सुरेश नाडे यांचे पत्नीसोबत नेहमी भांडण व्हायचे. या भांडणात हातात जी वस्तू येईल त्या वस्तूने मारहाण करायची, त्यामुळे भांडणातून झालेल्या मारहाणीतच सुरेश वाडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यूचे कारण समोर यावे म्हणून नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली, त्यानुसार मृतदेह धुळे येथे हलविण्यात आला.
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट
हरिविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत सुरेश नाडे, पत्नी अंजली, शुभम व शुभांगी अशी दोन मुले या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होते. हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह भागवित होते. 2005 मध्ये त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला आहे. तर अंजली हिचाही घटस्फोट झाला आहे. दोघेही प्रेमप्रकरणातून आले. लग्न न करताच एकत्र राहत होते, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
काय घडली घटना
रविवारी सुरेश नाडे यांची अचानक तब्येत बिघडली व ते जमीनीवर कोसळले. बेशुध्दावस्थेतील वडीलांना बघून शुभांगी याच परिसरात राहणार्या तिच्या काकाकडे गेली. याठिकाणी तिने चुलत भाऊ अजय विनोद नाडे वडीलांबाबत माहिती दिली. त्यानुसार अजय धावतच घरी पोहचला, यावेळी त्याचे काका ताडे घरातच बेशुध्दावस्थेत पडलेले होते. त्याने तत्काळ इतरांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी सुरेश नाडे यांना मृत घोषित केले.
पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे
घटस्फोटीत अंजली हिला प्रेमसंबंधांतून घरात आणले. लग्न न करतातच दोघेही एकत्र रहायला लागले. त्यांना दोन मुले झाले. यादरम्यान काळात अंजली व सुरेश या दोघा पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायचे. या भांडणातून अंजली पती सुरेश यांना मारहाण करायची, अशाचप्रकारे भांडणातून अंजलीने केलेल्या मारहाणीतून सुरेश नाडे यांचा मृत्यू झालाचा आरोप करत अजय नाडे, विनोद नाडे यांच्यासह नातेवाईकांनी केला
इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी, धुळ्याला हलविता मृतदेह
रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरिक्षकांची भेट घेवून इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. कर्मचारी संभाजी पाटील, ललीत भदाणे यांची जिल्हा रुग्णालय गाठले. नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतेदह धुळे हलविण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली. वाडे याच्या डोळ्याजवळ सुज असून अंगावर इतरही मारहाणीच्या जखमा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात महिलांसह नातेवाईकांनी गर्दी केली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास नाडे याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून धुळ्याकडे हलविण्यात आला.