नालासोपारा :- दारूच्या नशेत माणूस कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतो हे पुन्हा एकदा उघड झाल्याची घटना नालासोपाऱ्यात झाली आहे. होणाऱ्या वाहिनीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिऊन नशेमध्ये मित्राच्या बायकोला अपशब्द वापरल्याने तो राग मनात ठेवून पहाटे 6 च्या दरम्यान दोन आरोपी मित्रांनी डान्सर मित्राची सिमेंटच्या विटेने (ब्लॉक) ठेचून हत्या केली आहे. आजूबाजूच्या लोकांनी व वडिलांनी प्रतिकला वाचविण्यासाठी अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मित्र शुभम संजय भिसे (20) आणि सम्राट विश्वनाथ पावसकर (28) यांना अटक केली आहे. प्रतिक निकम (22) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो डान्सर म्हणून विभातात प्रसिद्ध होता.
नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसरात प्रतीक कदम (22) हा आपल्या परिवारासोबत बि एम सी कॉलनी चन्द्रेश हिल्स सोसायटीच्या सी – 14 या इमारतीमध्ये राहत होता. त्याच्या मित्राच्या होणाऱ्या वाहिनीचा वाढदिवस असल्याच्या कारणाने प्रतिकचे वडील आणि त्याच इमारतीत राहणारे प्रतिकचे मित्र शुभम आणि सम्राट हे दारू पिण्याचा व खाण्याच्या कार्यक्रमासाठी जमले होते. सोसायटीच्या आवारात आजूबाजूला रात्री 11.30 वाजल्यापासून दारू पित होते. प्रतीक आणि शुभम याचे दारूच्या नशेत कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची झाली. रात्री 2 च्या सुमारास प्रतिकचे वडील प्रतिकला घेऊन घरी आले. वडील झोपलेले पाहून प्रतीक रात्री गपचूप घराबाहेर आला आणि दोन्ही मित्रांसोबत दारू पीत बसला. पहाटे 5 च्या सुमारास दारूच्या नशेत प्रतिक ने परत शुभम सोबत वाद केला व नंतर शुभमच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. याचाच राग मनात धरून आणि दारूच्या नशेत शुभम भिसे आणि सम्राट यांनी क्रीष्णराज हायस्कुलच्या बाजूला रस्त्यावर सिमेंटच्या विटेने (ब्लॉक) प्रतिक कदमच्या डोक्यावर आणि तोंडावर ठेचून हत्या केली आहे. प्रतिक कदम हा गालानगर या विभागात डान्सर म्हणून प्रसिद्धही होता.
रात्रभर सोसायटीच्या व आजूबाजूच्या परिसरात 2 मित्र, वडिलांसोबत प्रतिक दारू पीत होता. कोणत्यातरी कारणावरून वाद झाल्यावर वडील रात्री 2 च्या सुमारास प्रतिकला घेऊन घरी गेले पण वडील झोपल्यावर प्रतीक सोसायटीच्या खाली उतरून दोन्ही मित्रांसोबत दारू पीत होता. सिमेंटचा ब्लॉक प्रतिकच्या डोक्यात मारल्याने डोके फुटून रक्तस्त्राव झाला होता. अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
– मनोहर बंदरकर (स्थानिक रहिवाशी, गाळानगर)
दारूच्या नशेत दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यावर घटना स्थळी जाऊन पंचनामा करत दोन्ही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्रतिक ने शुभमच्या बायकोबद्दल अपशब्द वापरल्याने हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून पुढील तपास करत आहे.
– प्रकाश बिराजदार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस स्टेशन)