रावेर। शेतजमीन नावावर करून देत नसल्याचा राग आल्याने पतिने पत्नी व मुलांना विहीरीत धकलून हत्या केल्याची खळबळजनक घटना कुसुंबा शिवारात घडली. शनिवार 13 रोजी हत्या केल्याची घटन उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. आरोपी पति चंदन हरि राजळे यांनी सुमारे दोन वर्षा पूर्वी पत्नी तुलाबाई हिच्या नावाने दोन एकर शेती खरेदी केली होती. तो शेती विकुन पैशांची मागणी पत्नीकडे वारंवार करत होता. यासाठी तो पत्नीस सतत मारहाण शिविगाळ करून मानसिक त्रास देखील देत होता.
पोलिसात गुन्हा दाखल
शेवटी मध्यस्थींच्या सल्लाने ही शेतजमीन पतीच्या नावावर करण्याचे ठरले. परंतु तुळाबाई हीने पतीच्या नावावर शेतजमीन केली नाही याचा राग (आरोपी) चंदन राजोळे याला आला. त्याने शनिवारी पत्नी तुळाबाई राजळे (वय 28), मुलगा ईश्वर राजळे (वय 5) या मायलेकांना विहीरीतत धकलून दिले. याबाबत मयताचे वडील राघो गोविंदा कोळपे यांनी दिलील्या फिर्यादीवरुन आरोपी चंदन राजळे यांच्याविरुध्द गुन्ह्य दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार दीपक धोमने, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी व सहकारी तापास करीत आहे.