साक्री। जामखेळ गावातील एका महिलेस पळवून नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास महिलेच्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. सबंधित महिलेच्या पती सुरेश मोतीराम थैल व आरोपी विजय लक्ष्मण पवार वाद झाला होता. या वादातूनच पवार याने सुरेश थैल यांचा डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी संशयितावर पिंपळनेर पोलीस ठाण्यांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या सुरेश मोतीराम थैल (35) रा.जामखेल याच्या डोक्यात संशयित विजय लक्ष्मण पवार याने दगड घालून खून केला. काही दिवसांपूर्वी मयताच्या पत्नीला संशयिताने पळवून नेल्याने दोघांमध्ये वाद झाला होता.दरम्यान जुन्या वादातुन हि घटना घडली समोर येत आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात आरोपी विरोधात 302 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी विजय लक्ष्मण पवार हा फरार आहे. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड करीत आहेत
हॉटेल मॅनेजरला मारहाण संशयितांवर गुन्हा दाखल
धुळे । चिकन हंडीची ऑर्डर घेतल्यानंतर ग्राहक वेळेवर न आल्याने हॉटेल बंद केल्याच्या कारणावरुन चौघांनी हॉटेलचा मॅनेजर, वॉचमनला मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे हिसकावले तसेच हॉटेल मालकाच्या घरासमोर जावून दांगडोही केला. स्वामी नारायण कॉलनी,प्लॉट नं.21,धुळे येथे राहणार्या कुणाल बन्सीलाल करनकाळ या नालंदा हॉटेलच्या मॅनेजरने आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.1 रोजी नाना साळवे,अरुण भोई, वाल्मीक हरळ, विजय अहिरे सर्व रा.धुळे यांनी दि.1 रोजी हॉटेल नालंदा येथे फोन करुन चिकन हंडी तयार करण्याची ऑर्डर दिली. उशिरापर्यंत ते चिकन हंडी घेण्यासाठी आले नाही.त्यामुळे मॅनेजर कुणाल करनकाळ यांनी नालंदा हॉटेलच्या मॅनेजर, वॉचमनला मारहाण हॉटेल मालकाच्या घरासमोरही केला दांगडो हॉटेल बंद केले आणि ते निघून गेले. ऑर्डर देवूनही चिकन हंडी मिळाली नाही यामुळे संतप्त झालेल्या नाना साळवेंसह चौघांनी हॉटेलचा वॉचमन सुधाकर चौधरी यांना मारहाण केली तसेच कुणाल करनकाळ यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर रात्री 1.30 वाजेच्या सुमारास हे चौघे हॉटेल मालकराहत असलेल्या अलंकार सोसायटीत गेले. हॉटेल मालकाच्या घरासमोर जावून त्यांनी शिवीगाळ केली. दि.1 रोजी ही घटना घडली होती.याप्रकरणी भादंवि 392, 323, 504, 506, 34 प्रमाणे आझादनगर पोलिसात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय तडवी करीत आहेत.
मुलीच्या छेडखानीवरुन जुने धुळ्यात तरुणावर हल्ला
मुलीच्या छेडखानीवरुन जुने धुळ्यात तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना संध्याकाळी घडली असून या घटनेनंतर परिसरातील वातावरण तंग झाले होते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावला. याप्रकरणी जखमी तरुणासह तिघांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने धुळ्यातील गल्ली नं.14 मधील बालगोपाल विजय व्यायाम शाळेजवळ राहणार्या संगिता मच्छिंद्र ठाकरे (वय 48) या किराणा दुकानदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीचे नाव का घेतले अशी विचारणा करत शशि गुरव अणि रोहित साळुंखे दोघे रा.जुने धुळे यांनी संगिताबाईचा भाचा प्रशांत राजेंद्र खोंडे (वय 17) याच्यावर हल्ला केला. शशिकांत गुरवने हातातील लाकडी दांडक्याने प्रशांतच्या डोक्यावर प्रहार केल्याने त्याच्या छोट्या मेंदूला गंभीर स्वरुपाची जखम झाली आहे. तसेच या दोघा आरोपींनी संगिताबाई अन्य एकाला शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी हिंमत जाधव, आझादनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, एपीआय डी.ए.पाटील यांनी घटनास्थळला भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून, वातावरण चिघळू नये यासाठी पोलिस बंदोबस्त लावला. भादंवि 307, 504, 506 प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.