धुळे : धुळे शहराचे आमदार अनिल गोटे व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा मनपाचे स्वीकृत नगरसेवक मनोज मोरे यांच्यात सुरू असलेला पत्रक वाद थेट पोलीस स्टेशन ला गेल्यामुळे दोघांच्याही पत्नीने एकमेकांच्या पती विरोधात तक्रार दिली आहे.
शहरातील गुडया हत्याकांडांनतर आ गोटे व मनोज मोरे यांच्यामध्ये एकमेकांवर चिखलफेक करणारी पत्रकबाजी सुरू होती, अगदी खालच्या स्तराची बदनामकारक भाषा वापरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असताना कुटुंबातील महिला सदस्यांची देखील अब्रू पत्रकातून काढण्यात येत होती. दरम्यान काल परवाच्या पत्रकावरून आ गोटे यांच्या पत्नी सौ हेमलता गोटे माजी नगराध्यक्षा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मनोज मोरे यांच्या विरोधात आजाद नगर पोलीस ठान्यात बदनामी केल्या संदर्भात लेखी फिर्याद दिली. तर भाजपा आमदार अनिल गोटे व अनोळखी हस्तकाविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात सौ. भारती मनोज मोरे यांनी पत्रकातून बदनामी केल्याप्रकरणी लेखी फिर्याद दाखल केली आहे.