पत्रकारांचे पावसात‘जवाब दो’ आंदोलन

0

पुणे । डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना कधी पकडणार? त्यामागील सूत्रधार केव्हा शोधणार? आरोपींना शिक्षा केव्हा होणार? व खुनाचे सत्र केव्हा संपेल? असे अनेक प्रश्‍न घेऊन पुणे शहरातील पत्रकारांनी बालगंधर्व जवळील वि. रा. शिंदे पुलावर बुधवारी भर पावसात ‘जवाब दो’ आंदोलन केले. या ठिकाणी सातत्याने 49 महिने दर 20 तारखेला ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता कार्यकर्ते व पुण्यातील पत्रकार मित्र शासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलन करीत आहेत. बुधवारी झालेल्या आंदोलनाला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे व अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.