पनवेल : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र यांच्यावतीने दिनांक 29 व 30 जुलै रोजी पनवेलमधील आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महिला पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन होत आहे. या प्रसंगी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवणार्या पाच महिला पत्रकारांना सौदामिनी जीवनगौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.