पत्रकारांनी विधायक काम करून समाजाला दिशा द्यावी

0

माजी आमदार अरुण पाटील ; रावेरला पत्रकारांचा सत्कार

रावेर- आजच्या काळात पत्रकारीता करणे हे व्रत असून पत्रकारांनी समाजाच्या हितासाठी सकारात्मक व विधायक पत्रकारीता करत समाजाला दिशा देण्याचे काम करावे, शासनाने तालुक्यातील पत्रकारांना घरकुल, त्यांच्या पाल्याना शिक्षण, आरोग्य निःशुल्क द्याचे तसेच त्यांना मानधन नव्हे तर पगार सुरू करावा, अशी मागणी माजी आमदार अरुण पाटील यांनी येथे केली. फुले, शाहु, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमिश्र रविवारी पत्रकारीतेत तब्बल 38 वर्ष झालेले ज्येेष्ठ पत्रकार देवलाल पाटील, दिलीप वैद्य यांचा संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास यावेळी उप प्रादेशिक अधिकारी जयंत पाटील, तहसीलदार विजयकुमार ढगे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य गोपाळ नेमाडे, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती माजी सभापती नीळकंठ चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, अ‍ॅड.योगेश गजरे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जगदीश घेटे, पंकज वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांचा सन्मानपत्राने गौरव
यावेळी पत्रकार प्रदीप वैद्य, सुनील चौधरी, समशेर खान, शालिक महाजन, वासु नरवाडे, शेख शरीफ, जयंत भागवत, मोरेश्वर सुरवाडे, सरदार पिंजारी, यूसुफ खाटीक, तारीक नूर, प्रशांत पासे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी फुले, शाहु, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारीता करणार्‍या पत्रकार बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन नगीनदास इंगळे तर प्रस्तावना राजेंद्र अटकाळे यांनी केली.