पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा- धनंजय मुंडे

0

मुंबई- ‘टाईम्स नाऊ’च्या पत्रकारावर हल्ला करण्यात येऊन जखमी करण्यात आले. राज्यातील पत्रकारांवर वारंवार हल्ले केले जात असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आहे. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाईसाठी कायदा असतांना देखील कायद्याचे उल्लंघन करून पत्रकारांवर हल्ले होत आहे. हे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचेच उदाहरण असून ‘टाईम्स नाऊ’च्या पत्रकारावर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.