हडपसर : एमआयटी संचलित विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने पूर्व हवेलीतील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी यांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिराचा पूर्व हवेलीतील 41 पत्रकारांनी लाभ घेतला.
शहरात व ग्रामीण भागात मधुमेहाने मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित आहेत. त्यामुळे यापुढे मधुमेह तसेच विविध उपचारांवर माफक दरात उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक महिन्यात शेवटच्या आठवड्यात वेगवेगळ्या आजारांवर शिबिर भरवले जाणार असल्याचे जनरल मॅनेजर डॉ. आशिषकुमार दोशी यांनी सांगितले.