पत्रकारांसाठी पेन्शन योजनेला मुहूर्त!

0

नागपूर: पत्रकारांची बहुप्रतिक्षित पेन्शन योजना अखेर प्रत्यक्षात आली. पुरवणी मागण्यात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आभार मानण्यात आले. या निर्णयासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सातत्याने मागणी करीत होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राजभवनावर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात याच वर्षी पेन्शन लागू करण्याची घोषणा केली होती. राज्यातील अनेक पत्रकार संघटनाही त्यासाठी प्रयत्न करत होत्या. या मागणीला अखेर यश आले.