प्रतिनिधी । वरणगांव
पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना स्थानिक लोक प्रतिनिधीच्या राजकीय प्रवृत्तीने प्रेरीत झालेल्या काही गुंडानी मारहाण केली. हि घटना निंदनीय असुन या घटनेचा वरणगांव शहर पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
अन्याया विरुद्ध आवाज उठवणाऱ्या मारहाणीचा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या आधारस्तंभाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे . यामुळे शासनाने या घटनेची गंभीर दखल घेवून मारहाण करणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांची सखोल चौकशी करून त्यांना व मारहाणीसाठी प्रेरीत करणाऱ्या स्थानिक लोक प्रतिनिधीवर कठोरपणे कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वरणगांव पोलीस ठाण्याचे सपोनि आशिषकुमार आडसुळ व पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना देण्यात आले. तसेच या घटनेचा वरणगांव शहर पत्रकार संघाचे विजय वाघ, सुनिल वानखेडे, मनोहर लोणे, सुरेश महाले, बाळासाहेब चव्हाण, अजय जैस्वाल, अनिल पाटील, राजु खडसे, किरण कोलते, सुनिल पाचपोळ, दत्ता गुरव, संतोष गौड, अरुण धनगर आदींनी निषेध व्यक्त केला आहे.