पत्रकारिता आणि मीडियाच्या बदलत्या प्रवाहात मूल्यांचे रक्षण व्हावे

0

* प्रा. कमल दीक्षित यांचे प्रतिपादन
* डॉ. सोमनाथ वडनेरे लिखित यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
जळगाव – मूल्यांचा -हास प्रत्येक क्षेत्रात होत आहे. पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रही त्यास अपवाद नाही. या क्षेत्रांमध्ये नवीन मापदंड स्थापित होत आहेत या नवीन प्रवाहात मूल्यांचे रक्षण व्हावे, अशी अपेक्षा आणि आशा ज्येष्ठ पत्रकार प्रा. कमल दीक्षित यांनी व्यक्त केली. डॉ. सोमनाथ वडनेरे लिखीत ‘पत्रकारिता तथा मीडिया सेवा के बदलते आयाम’ या हिंदी पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी नडीयाद येथे आध्यात्मिक पत्रकारिता लेखन प्रशिक्षणात प्रा. कमल दीक्षित, माजी विभागाध्यक्ष, माखनलाल चर्तुवेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय, भोपाळ तथा संस्थापक, सोसायटी ऑफ मीडिया इनिशिएटीव्ह फॉर व्हॅल्यूज, भोपाळ हे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, प्रारंभी पत्रकारितेचे सेवा अर्थात् मिशनचे रूप कधी प्रोफेशन झाले कळलेच नाही. मीडियाने उद्योगाचे रूप जरी धारण केलेले असले तरीही या बदलत्या प्रवाहात पत्रकारिता आणि मीडियाने सेवावृत्ती सोडता कामा नये लोकहितकारी हेतु डोळ्या समोर ठेवून पत्रकारितेतील शाश्वत मूल्यांची राखण व्हावी.

नवपत्रकारांसाठी उपयुक्त ग्रंथ
पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रात प्रवेश करणा-या नव पत्रकारांसाठी डॉ. वडनेरे यांनी लिहिलेले पुस्तक हे उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादनही प्रा. दीक्षित यांनी याप्रसंगी व्यक्त केले. नडीयाद येथील प्रभूशरण भवनात तीन दिवसीय आध्यात्मिक पत्रकारिता लेखन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे प्रथम हिंदी पुस्तक यांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.