पत्रकारीता अभ्यासक्रमाची 11जुलैला प्रवेशपूर्व सीईटी

0

जळगाव । येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी इच्छुक असणार्‍या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 11 जुलैला मंगळवारी उमवित संबंधित विभागात सीईटी म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट या पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.

जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्वपरीक्षा देणे अनिवार्य असून, कोणत्याही शाखेचे पदवीधर ही 11 जुलैला होणारी सीईटी परीक्षा देण्यास पात्र असणार आहेत. ही परीक्षा सामान्यज्ञान, लेखन कौशल्य आणि भाषांतर यावर आधारीत बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. तसेच इच्छुक युवकांनी प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी 9 जुलै पर्यंत उमवि जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात नावनोंदणी करणे गरजेचे असून, अधिक माहितीसाठी कला व मानवविद्या प्रशाळेचे प्र. संचालक आणि संबंधित विभाग प्रमुख प्रा.डॉ.तुकाराम दौड मो.क्र.9420428453 आणि सहाय्यक प्रा.डॉ.सुधीर भटकर मो.क्र.9423490044 यांचीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.