पत्रकार कमलाकर माळी यांना राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार प्रदान

0

रावेर- तालुक्यातील वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी यांना सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा ग्रुप घाटी यांच्या ‘माणुसकी’ या ग्रुपच्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्तान सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नुकताच औरंगाबाद येथील छत्रपती हॉल, पिसादेवी रोड, हर्सूल येथे दुपारी वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडला. पत्रकारीता क्षेत्रातील व समाजसेवेत अग्रेसर असलेले कमलाकर माळी पत्रकरीतेच्या माध्यमातून नेत्रदान शिबिर ग्रामस्वच्छता अभियान व विविध उपक्रम राबवत आहेत . त्यांच्या कार्याची घेत औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते देण्यात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कर्नल राज, ईब्राहिम पठाण, सुरेंद्र सुरवे, समाजसेवक सुमीत पंडीत उपस्थित होते.