पत्रकार कुटुंबीय हत्येप्रकरणी पत्रकार संघातर्फे  निवेदन

0
अमळनेर – नागपूर येथील नागपूर टुडे वेबसाईटचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई उषा कांबळे व मुलगी राशी कांबळे यांचे अपहरण करून नुकतीच हत्या करण्यात आली. या घटनेचा तिव्र निषेध करीत अमळनेर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.  घडलेली ही घटना अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी तसेच पत्रकार रविकांत कांबळे  कुटुंबियांना शासनाकडून यथायोग्य मदत मिळावी. असे निवेदनात म्हटले आहे. वरील निवेदन तहसिलदार प्रदीप पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनाही पाठविण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, अमळनेर तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी, निरंजन पेंढारे, विजय पाटील, गं.का.सोनवणे, विजय सुतार आदी यावेळी उपस्थित होते.