पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्त्येचा निषेध

0

चाळीसगाव । देशात ज्या पध्दतीने जाणीव पुर्वक वातावरण निर्माण करुन धर्म निरपक्ष व लोकशाहीवादी प्रतिमेवर घाला घातला जात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे.डाँ.नरेंद्र दाभोळकर,काँ.गोविंद पानसरे,डाँ.एम.एस.कलबुर्गी,यांची हत्या झाल्यावर पुन्हा जेस्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची नुकतीच केली गेलेली हत्या हि वैचारिक स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे.त्यापेक्षाही भयंकर बाब म्हणजे सोशल मिडीयातुन जो वर्ग या हत्येचा भलावन करीत आहे.या सर्वांच्या जातकुळी ही मारेकर्यांची जातकुळी आहे.आणि ही माणसिकता वेळीच थोपवली नाही तर हा देश पुन्हा एकदा जाती धर्म पंथाच्या विळख्यात सापडेल गौरी लंकेश यांच्या मारेकर्याना तात्काळ अटक करुन कठोर शासन करावे. या घटनेचा पुरोगामी संघटना जाहिर तिव्र निषेध करीत असल्याचे निवेदन आज दिनांक 7 सप्टेंबर 2017 रोजी नायब तहसिल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक गणेश पवार, लोकसंघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, राकेश निकम, प्रदिप देसले, कारभारी पवार, पंकज पाटील, गणेश देशमुख, प्रकाश फणसे, भरत गायकवाड, चंद्रसिंग मोरे, दिपक देवरे, राजेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.