पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम दोषी !

0

नवी दिल्ली-पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीमला दोषी ठरविण्यात आले आहे. बाबा राम रहीमसह चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने आज सुनावणी केली. १७ जानेवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. २००२ रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्य पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती.

न्यायालय आज सुनावणी होती, त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पोलिसांनी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवत १४४ कलम लागू केले होते.