पत्रकार ललितकुमार फिरके यांचा राष्ट्ररत्न पुरस्काराने गौरव

0

सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

भुसावळ- भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवासी ललितकुमार फिरके यांना पत्रकारीता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार 2018 या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरळी कांचन आणि नेहरू युवा केंद्र क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके, उद्योजक मिलिंद चौधरी, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. एल. झेड. पाटील, डॉ. दीपक ऊर्फ ज्ञानेश्वर पाटील, कर्नल अरविंद जोगळेकर, कॅप्टन शिंदे, दिनकर चौधरी, प्रगतीशिल शेतकरी टेनू बोरोले उपस्थित होते. ललितकुमार फिरके गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारीतेत असून त्यांनी समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक बांधिलकी वृत्तपत्राच्या माध्यमातून जोपासण्याचे काम केले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला.