पिंपरी : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे यांना पत्रकारिता विषयात पीएच. डी. जाहीर झाली. पत्रकारिता आंतरविद्याशाखेअंतर्गत ‘लोककला, ललितकला एक सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक अभ्यास’ असा संशोधनाचा विषय होता. माध्यमांनी कला संवर्धनासाठी बजालेली भूमिका, समाज परिवर्तनात कलांची भूमिका याचा अभ्यास केला आहे. कुलगुरू डॉ. दीपक टिळक, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, माध्यम विभागाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक-मोने, इतिहास विभागाचे प्रमुख व्ही. डी. कुलकर्णी यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले. विश्वास मोरे हे संत साहित्य आणि कला साहित्याचे अभ्यासक आहेत.