पत्रकार संघाकडून वृक्षांचा वाढदिवस साजरा

0

नवापूर । तालुका दैनिक पत्रकार संघाकडून गतवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पत्रकार संघाने गतवर्षी महात्मा गांधी वाचनालयात एक जुलै रोजी 24 वृक्षांची लागवड केली होती. वर्षभर वृक्षांचे चांगले संगोपन करून वृक्ष वाढवले. परिसरात चांगली हिरवळ निर्माण झाल्याने यातून अनेकांनी प्रेरणा घेतली. एक वर्षानंतर वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावर्षी वृक्ष लागवड करून पुढील वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील व सहकारी यांनी केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी संघाचे उपाध्यक्ष नीलेश पाटील, कोषाध्यक्ष सुधीर निकम, सल्लागार प्रा.आय.जी पठाण, मंगेश येवले,महेंद्र चव्हाण, विनोद सुर्यवंशी, अभियंते बबनराव जगदाळे, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी ईलामजी गावित आदि अधिकारी व वाचक उपस्थित होते.