पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुर्यकांत कदम

0

चाळीसगांव । अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक जनशक्तीचे सुर्यकांत कदम आणि गणेश पवार यांनी निवड करण्यात आली आहे. तर चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी दिलीप घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. 15 जानेवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा बैठक जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली.

यावेळी पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसुदन कुलथे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजय पोहणकर, प्रदेश सचिव रविंद्र पवार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण सुर्यवंशी, पवन पाटील, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नरेंद्र कदम, जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, महानगर प्रमुख ललीत खरे आदी उपस्थिती होते. निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.