पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणपतीला निरोप

0

तळोदा । तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या श्रीची स्थापना करून उत्साहात विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. येथील प्रा. गो. हु. महाजन हायस्कुलचे विद्यार्थीनीचे लेझीम पथक सहभागी झाले होते. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यावर्षा पासून प्रथमच दीड दिवसाच्या श्रीं ची स्थापना केली होती. दुसर्‍या दिवशी श्रींची विसर्जन मिरवणूक येथील स्मारक चौकातुन प्रारंभ करण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थींनींच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. विसर्जन मिरवणूक ही शिस्तबध्दरित्या काढण्यात आली.

सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
विसर्जन मिरवणुकीत डॉ शशिकांत वाणी, संजय माळी, नगरसेवक अजय परदेशी, पंकज राणे, गौरव वाणी, हेमलाल मगरे, अनिल माळी, भगवान मगरे, डॉ स्वप्नील बैसाने, शिरीष माळी हे मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत सुभाष चौधरी, गौतम जैन, हितु क्षत्रिय, योगेश मराठे, रसिकलाल वाणी, प्राचार्य अजित टवाळे, नंदू जोहरी, भीमा महाले, ईश्वर पोटे, बापू कलाल, अ‍ॅड. संजय पुराणिक, अ‍ॅड. सचिन राणे, किशोर चव्हाण पत्रकार अक्रम पिंजारी, गणेश गुरव, वसंत मराठे, श्याम सोंनगडवाला , अविनाश मराठे, प्रसाद बैकर, गोकुळ पवार, विनोद कलाल, निलेश न्हावी, माणसिंग राजपूत, आदी उपस्थित होते.