भुसावळ– पत्रकार हे समाजाचे अंग असून प्रसिद्धी माध्यमांनी सामाजिक भान राखून पत्रकारीता करावी, असे आवाहन मान्यवरांनी पत्रकारांच्या सन्मानप्रसंगी केले. विभागात ठिकठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
* वरणगावात पत्रकारांचा सन्मान
वरणगाव- वरणगाव नगरपालिका, पोलीस स्टेशन व भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकार दिन छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी भुसावळचे माजी प्रभाररी नगराध्यक्ष अनिल चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्दक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक नवलसिंग राजपूत, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे , नगरसेवक गणेश धनगर, रवी सोनवणे, राजेंद्र चौधरी, वैशाली देशमुख, रोहिणी जावळे , प्रतिभा चौधरी, समाजसेवक संजीव कोलते, मिलिंद मेढे, प्रा.जतीन मेढे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा व पत्रकारांचा सत्कार आयोजक मराठा महासंघ व अॅड.तुषार पाटील यांनी केला. प्रा.जतीन मेढे यांनी पत्रकारांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले तर सुनील काळे यांनी नगराध्यक्ष होण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य लाभल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अनिल चौधरी यांनी वरणगांवमध्ये पत्रकारांसाठी सुविधा देण्याचे आवाहन केले. संजीव कोलते, प्रशांत सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन शिलांबरी जमदाडे यांनी तर प्रास्ताविक विजय वाघ यांनी केले. आभार संतोष माळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी पत्रकार सुरेश महाले, सुनील वानखेडे, मनोहर लोणे, अनिल पाटील, विनोद मास्टर, संतोष गौड, अजय जैस्वाल, भूपेन्द्र महाजन, सुनिल पाटील व नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
पत्रकार दिनानिमित्त चुंचाळे येथे रक्तदान शिबिर
चुंचाळे, ता.याव- ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पत्रकाराचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांनी पत्रकारांचा गौरव केला. संजय पाटील, ग्रामसेवक जयवंत पाटील, सदस्य सुकलाल पाटील, रहेमान तडवी, नितीन पाटील, विनोद पाटील, युवराज पाटील उपस्थित होते. त्यानंतर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यावल तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चुंचाळे सरपंच संजय पाटील व बोराळे येथील सरपंच वंदना विनोद चौधरी यांनी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
* यांनी केले रक्तदान
राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे माजी तालुकाध्यक्ष विनोद पाटील, बोराळे येथील उपसंरपच उज्जैनसिंग राजपूत, युवासेना अध्यक्ष लिलाधर धनगर, चुंचाळे वि.का.सो.संचालक ज्ञानेश्वर पाटील, मयुर चौधरी, दीपक कोळी, भुषण राजपूत, निलेश राजपूत, योगेश पाटील, समाधान पाटील, गिरीश सपकाळे, राजु सोनवणे, शाहरुख तडवी, अशोक धनगर यांच्यासह 31 रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान करणार्या रक्तदात्याना गोदावरी रक्तपेढी याच्याकडून प्रमाणपत्र व कार्ड देण्यात आले. प्रत्येकाने वर्षात किमान दोन वेळा रक्तदान करावे, असे आवाहन गोदावरी रक्तपेढीचे डॉ.अभिषेक हजारे यांनी केले. रक्तपेढी समन्वयक लक्षण पाटील, टेक्नीशीयन दिनेश भोळे, हिरामण लांडगे, रविंद्र तवर, मयुरी पाटील, दीपाली पाटील उपस्थित होते.
सोशल मिडीयाच्या आव्हानासमोर प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम -अॅड.रविंद्रभैया पाटील
मुक्ताईनगर- सोशल मीडियाची समाजात विश्वासार्हता नसून त्याचा समाजाच्या चांगुलपणासाठी कमी तर विध्वंसक गोष्टीसाठी जास्त वापर होत आहे आणि हल्लीच्याच काळात देशात व राज्यात त्यामुळेच अराजकतेची परीस्थिती निर्माण झालेली दिसुन येत आहे तर या काळातही प्रिंट मीडियाद्वारे दिले जाणारे वृत्तांकन यावरच वाचकांचा विश्वास असल्याने प्रिंट मिडियाने आपली स्वतंत्र अशी विश्वासार्हता कायम जपलेली आहे, असे प्रतिपादन संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रविंद्र भैय्या पाटील यांनी केले. वारकरी बहुउद्देशीय संस्था व संत मुक्ताई संस्थानच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जि.प. चे माजी गटनेते विनोद तराळ, आनंदराव देशमुख, ईश्वर रहाणे, यु.डी.पाटील, हभप रविंद्र महाराज हरणे, हभप उद्धव महाराज जुनारे, निवृत्ती पाटील, पुरुषोत्तम वंजारी, विशाल सापधरे, डॉ.विक्रांत जैस्वाल, रमण जैन, डॉ.दिवाकर पाटील, चंदु पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार विकास चौधरी, विनायक वाडेकर व मतिन शेख यांनी सत्काराला उत्तर देतांना मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार विकास चौधरी, विनायक वाडेकर, संदीप जोगी, शरद बोदडे, मुकेश महल्ले, एम.के.पाटील, मतिन शेख, दीपक चौधरी, राजेश पाटील, संतोष मराठे आदीसह सुभाष भोंबे, गणेश भोंबे, धनराज सापधरे हे वृत्तपत्र विक्रेते सुद्धा उपस्थित होते.