पत्रलेखन स्पर्धा

0

पिंपरी । पत्र लेखनाविषयी समाजात जागृती व्हावी, यासाठी टपाल खात्यातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयातील व्यवस्थापकीय घटकाला प्रेरीत करण्यासाठी पत्र लिहिता येणार आहे. आंतरदेशीय पत्रांसाठी पाचशे शब्द व लिफाफा असल्यास एक हजार शब्दांची मर्यादा आहे. आंतरदेशीय पत्र किंवा लिफाफा या दोनच पत्रांचा वापर स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

येत्या 15 ऑगस्टपूर्वी चीफ पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001 या पत्यावर स्पर्धेची पत्रे पाठवावीत. पत्राच्या मागील बाजूस स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पत्ता, वय, पिनकोड लिहिणे बंधनकारक आहे. पुणे प्रधान डाक घर, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस व चिंचवड पूर्व पोस्ट ऑफीस येथे विशेष टपाल पेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक गटातून तीन विजेते स्पर्धक निवडण्यात येणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने साबरमती आश्रम येथे होणार्‍या कार्यक्रमात विजेत्या पत्र लेखकांचा सन्मान केला जाणार असल्याचे टपाल खात्याने कळवले आहे.