पत्राशेडमधील लोकांना घरे देण्याची मागणी

0

चिंचवड : जेएनयुआरएमअंतर्गत चिंचवड लिंकरोड येथील नागरिकांना त्यांची हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश निकाळजे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

यामध्ये म्हटले आहे, लिंकरोड येथील पत्राशेडच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना तात्पुरते नागरिकांचे स्थलांतर चिंचवड लिंकरोड येथील स्मशानभूमी शेजारी करण्यात आले होते. पण याठिकाणी घरांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याठिकाणी गैरसोय होत आहे. जेएनयुआरएमअंतर्गत तयार झालेल्या हक्काच्या घरासाठी आणखी किती दिवस वाट पहायची असा प्रश्‍न येथील संतप्त नागरिक करीत आहे. महानगरपालिकेच्या व व राजकीय स्वार्था पोटी नागरिकांच्या करातील करोडो रुपये खर्च करुन तयार केलेली हक्काच्या घरांपासून नागरिकांनाच वंचित रहावे लागत आहे.