पथनाट्यातून दिला मुलगी वाचवा संदेश

0

तळेगाव स्टेशन : येथील बाळासाहेब शेळके शिक्षण संस्था संचलित इंद्रायणी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त मुलगी वाचवा – देश घडवा या पथनाट्याच्या माध्यमातून तळेगाव स्टेशन व परिसरातील ग्रामीण भागात जनजागृती केली.

स्टेशन भागातील चौकाचौकात तसेच यशवंतनगर,वराळे फाटा, भोंगाडे वस्ती, शिवाजी चौक, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आंबी, वराळे, वारंगवाडी या गावांमध्ये पथनाट्य सादर करुन स्त्री नात्यांचे स्थान व महत्त्व या विद्यार्थ्यांनी पटवून दिले. मुख्याध्यापिका रंजिता थंपी यांच्या संकल्पना व प्रेरणेतून वंदना सपताळे यांनी या पथनाट्याचे लेखन केले. दिग्दर्शन तेजश्री अभ्यंकर व गौरी जाधव यांनी केले. उपमुख्याध्यापिका रंजना जोशी व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग यांचे या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.