नवी मुंबई । ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षामार्फत 23 ऑक्टोबरपासून स्वच्छताविषयक विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून, 22 नोव्हेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा असे तयार होतो त्याच ठिकाणी वर्गीकरण करणे व कचरा गाडीमध्ये वेगवेगळा देणे, त्याचप्रमाणे मोठ्या सोसायट्या, संस्था, हॉटेल्स यांनी आपल्या आवारातच ओल्या कचर्यावर प्रक्रिया करणारा खतनिर्मिती प्रकल्प राबवणे याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याशिवाय नागरिकांना दैनंदिन स्वच्छताविषयक तक्रारी नोंदवण्यासाठी उपलब्ध आहे
त्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेऊन संपूर्ण महापालिका क्षेत्रातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये शेल्टर असोसिएशनच्या माध्यमातून सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांमध्ये शौचालय वापराबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहर हे मानांकन कायम राखण्याच्या दृष्टीने शौचालयांच्या वापराबाबत शहरामधील सर्व वर्दळीच्या ठिकाणी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत प्राप्त डिझाइनचे जनजागृतीपर बॅनर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेमध्ये सर्व विभाग कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक, शेल्टर असोसिएशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्वच ठिकाणे नागरिकांनी या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.