पथराडे शिवारातील केळी पोहोचली जम्मु काश्मीरला

0

यावल- तालुक्यात वाढत्या उन्हामुळे जलपातळी खोलवर जात असून शेतककर्‍यांनी विविध संकटांचा सामना केळी टिकवण्यासाठी धडपड चालवली असून तालुक्यातील पथराडे गावातील केळी थेट जम्मू-काश्मीरला झाल्याने समाधान व्यक्त होत असून या कोळी चांगला भाव मिळू लागला आहे.

वढोद्याची केळी पोहोचली जम्मू काश्मीरात
वढोदा प्र.यावल येथील शेतकरी पंडीत राजाराम सोंळके यांची पथराडे शिवारात जैन कंपनीचे टिशु केळीचे तीन हजार दोनशे रोप लागवड केली होती. 810 झाडाची कापणी करून 153 क्विंटल केळी जम्मू-काश्मीरला रवाना करण्यात आली. जिल्हा परीषदेतील काँग्रेसचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांचाहस्ते केळीची कापणी करून केळीने भरलेला टाँला रवाना करण्यात आला. साकळी येथील शेतकरी सुभाष महाजन व योगेश फर्टिलाझरचे बाळु पाटील यांचा मार्गदर्शनाखाली एका गरीब शेतकर्‍यांची केळी प्रथमच जम्मू काश्मीरला गेल्यामुळे शेतकर्‍याचे कौतुक होत आहे. केळीच्या झाडाची एक-एक फणी छाटणी करून ट्रे भरण्यात आले. यावेळी थोरगव्हाण येथील समाधान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता संदीप सोनवणे, बाळु शिंपी पथराडे येथील हरीभाऊ पाटील उपस्थित होते.

चक्रीवादळाचा तडाखा न बसल्याने समाधान
मनवेल, थोरगव्हाण पथराडे परीसरात केळीची लागवड वाढत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चक्रीवादळाचा मोठा फटका केळीला बसत असल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेले दोन ते तीन वर्ष केळी उत्पादकांची हलाखीची गेली यंदा मात्र निसर्गाने साथ दिल्याने चक्रीवादळाचा फटका केळी उत्पादक यावल परीसराला बसला नाही. त्यामुळे केळी पिकाने जोर धरला असून जळगाव जिल्ह्यातून प्रथमच केळी जम्मु काश्मीरला रवाना झाली.आब्यांचे आगमन झाल्यानंतर भाव पडतील, अशी शंका असताना इराकने हात दिला आणि आज एक हजार 400 पर्यंत भाव केळीला मिळू लागला आहे. त्यामुळेही शेतकरीवर्गात समाधान आहे. असे असलेतरी रावेरपासून 45 किमी अंतरावरील मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूरला केळीला दोन हजारापर्यंत भाव दिला जात आहे. मध्य प्रदेशात चांगले रस्ते असल्याने त्यावरून वाहतूक करताना केळीचे नुकसान होत नाही. उलट रावेर व यावल परिसरातील रस्ते सपाट नसल्याने केळीचे घड वाहतूक करताना एकमेकांवर घासले जातात याचा परीणाम दरावर होत असल्याचे सांगण्यात आले.